कर्दळीवन एक अनुभूती-सखोल संशोधनातून तयार झालेला ग्रंथ.
हत्या बेनझीर भुत्तोंची-का आणि कशी
रु.750/- च्या पुढील खरेदीवर (महाराष्ट्रा बाहेर फ़्रि होम डिलीव्हरी)

महाराष्ट्रातल्या जनतेला जिने मंत्रमुग्ध केले, अशी मराठी सारस्वतातील अजरामर साहित्यकृती..साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. मराठीमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली व रसिकमान्यता पावलेली रणजित देसाई यांची कादंबरी. थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन, कर्तृत्व आणि त्यांचे वैयक्तिक करुणगंभीर जीवन याचे अतिशय उदात्त व प्रभावी चित्रण स्वामीत केलेले आहे. इतिहास आणि साहित्य ह्याचे एवढे उर्जस्वल नि रोमहर्षक रसायन मराठी भाषेत आजतागायत कोणी निर्माण करू शकलेले नाही. कादंबरीतील अतिशय उठावदार आणि कलात्मक व्यक्तिरेखा आहेत, माधवराव, रमाबाई आणि राघोबादादा यांच्या. सद्गुणी आणि तेजस्वी कर्तव्यदक्ष माधवराव, स्वार्थी, भोळसट, राजद्रो...
‘सुबोध बायबल’..जगात या ग्रंथाच्या हजाराहून अधिक भाषांमध्ये अनुवाद केला गेला आहे.आपल्या भारतातच तब्बल २००बोलीभाषांमधे या ग्रंथाचा अनुवाद उपलब्ध आहे.महात्मा गांधी, लिओ टॉलस्टॉय, पंडिता रमाबाई, साधू सुंदरसिंग,मदर तेरेसा, विनोभा भावे..या सारख्या असंख्य लोकांनी या ग्रंथातून प्रेरणा घेतली आहे..असे इतिहास सांगतो..पण तरीही सर्वसामान्य वाचकांना बायबलची पुरेशी माहिती असत नाही.ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ किंवा येशूचे चरित्र एवढीच जुजबी ओळख असते..‘नवा करार’ आणि ‘जुना करार’ काय आहे? हे कित्येकांना माहिती नसते. खरं तर हे दोन्ही करार मिळून होणारा बायबल म्हणजे एकच एक ग्रंथ नसून अनेक पुस्तकांचा संग्रह आहे...तसेच जिज्ञासेपोटी...
गिरिजा कीर यांच्या सर्वच लेखनामध्ये एक प्रकारचा एक जिनसीपणा आढळतो. त्यांची जीवनाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे तिच्यातही एक सूत्र आहे..यांच्या कथा, कादंबऱ्या, व्यक्तिचित्रे, प्रवासानुभ, ललित लेख, यांमधूनही त्यांच्या जीवनातील घटना प्रसंगाचे पुनःपुन्हा उल्लेख येतात. त्यांचे लेखन म्हणजे वाचकांशी साधलेला सुसंवादच..त्यामुळे ‘सर्वोत्कृष्ट गिरिजा कीर’ वाचतांना त्यांच्या व्यक्तिमत्वाची आणि त्यांच्या लेखन शैलीची मोहिनी वाचकांवर पडल्याशिवाय राहत नाही..
औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला किंवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही! गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी, कवी-राज्यकत्या|ची आणि पराक्रमी सेनानीची गाथा संशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती! आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांना सह्याद्रीच्या निबिड दर्याखोर्यांनी, सागरखाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांची चित्तथराक, वादळी, पण वास्तव गाथा!!
कर्नाटकातील अग्रगण्य कादंबरीकार तत्वचिंतक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी महाभारतावर लिहिलेली ही महाकादंबरी. यात मूळ महाभारतातील आभाळाएवढ्या उंचीच्या पात्रांचे वास्तव रूप रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. आधुनिक मानववंशशास्त्रीय, समाजशास्त्रीय संकल्पनेच्या प्रकाशझोतात महाभारताच्या व्यक्तिरेखांची संगती भैरप्पांनी लावली आहे. या कांदबरीमध्ये लेखकाने संज्ञा प्रवाहाचा फार मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. कादंबरीतील पात्रांच्या मनात येणारे विचार व्यक्त होता होता शेवटच्या एक दोन शब्दांबरोबर विचारांचा प्रवाह वेगळ्याच दिशेला वाहू लागतो. कुंती, भीष्म, द्रोणाचार्य यांच्यासारख्या दीर्घायुषी पात्रांच्या वाढत्या वयाचा 'फ...
हा जो महाभारत एक सुडाचा प्रवास आहे त्या प्रवासाचा उगम आहे महाभारताच्या भूतकाळात..भूतकाळात थैमान घातलेल्या ह्या सूडाचे प्रतिक्रियारुप उद्रेक भोगावे लागले आहेत महाभारताच्या वर्तमानाला, आणि त्या वर्तमानाला गिळंकृत करून ह्या सूडाची विध्वंसक नजर झेपावली आहे महाभारताच्या भविष्याकडे...त्यामुळेच ह्या प्रस्तुत लेखमालेचा प्रवास आहे महाभारतपूर्वकालीन ‘परशुराम’ ते महाभारतौत्तरकालीन ‘जनमेजय’...महाभारत घडत गेले..घडले..ते केवळ कोणी ना कोणी कोणावरतरी सूड उगवत राहिले म्हणूनच...
"हू इझ जॉन गाल्ट? तो म्हणाला होता तो जगाचा व्यवहार थांबवेल - आणि त्यानं ते केलंही ! पण जगाचा व्यवहार थांबवणारा हा संहारकर्ता होता कि मुक्तिदाता? तुमचं आयुष्य तुमचं आहे आणि ते पूर्णार्थाने जगणं हेच पुण्यकर्म आहे. प्रश्न जगायचं कि नाही याबाबतचा नसून विचार करायचा कि नाही असा आहे. माणसाच्या शारीर अस्तित्वापेक्षा त्याच्या बुद्धीचे अधिक्षेप करणाऱ्या, अन्याय करणाऱ्या जगाविरुद्ध उसळून उठून स्फुरलेली ही कादंबरी आयन रँडने विविध क्षेत्रांवर संशोधन करून आपल्या तत्वज्ञानाची धार अधिकाधिक तीव्र करीत लिहिली आहे. स्वताच्या बुद्धीवर,सामर्थ्यावर जग पेलायचा आत्मविश्वास बाळगणाऱ्या माणसांची ही कथा एका वेगळ्याच तर्कविश्वात घेऊन ...
करवीर अथवा कोल्हापूर हे क्षेत्र आणि श्रीमहालक्ष्मी ही त्या क्षेत्राची अधिष्ठात्री देवता यांना महाराष्ट्राच्या देव्हार्यात अग्रमानाचे स्थान आहे. अनेक मराठी घराण्यांची ही कुलदेवता आणि दक्षिणकाशीची प्रतिष्ठा पावलेले तिचे करवीर क्षेत्र यांचा स्वरूपशोध डॉ. ढेरे यांनी या ग्रंथात मर्मग्राही संशोधनदृष्टीने घेतला आहे. महाराष्ट्रातील साडेतीन श?तिपीठांपैकी एक असलेल्या या पीठाच्या प्रभावाचा मागोवा घेताना सातवाहनकाळापर्यंत पोचण्याचा त्यांचा साधार प्रयत्न लक्षवेधी आहे. महालक्ष्मीच्या नित्य-नैमित्तिक अशा दीर्घ उपासनापरंपरेचा परिचय तर त्यांनी या ग्रंथात घडवला आहेच, पण तिच्या क्षेत्रमाहात्म्याचा विविधांगी आणि व...
जगभरातल्या 30 हून अधिक भाषांमध्ये 50 लाख प्रतींच्या विक्रीचा टप्पा गाठणाारी "बेस्ट सेलर' कादंबरी ..... दूर देशाहून आलं होतं एक गोरं पाखरू. पळून आलं होतं. तुटलं होतं माणसांपासून...मातृभूमीपासून...जगण्यापासूनच! मागावर असलेले पोलीस आणि स्वत:च्या डागाळलेल्या आयुष्याची लाज वाटणाारं मन यापासून त्याला पळून जायचं होतं... लपून राहायचं होतं. ते उतरलं होतं मुंबईत. अंधारी, काळी, कलकलाटाची दुनिया, पिचलेली... तरीही ताठ उभ्या कण्याची! क्षणात नरडीचा घोट घेणारी, क्षणात प्रेमाची पाखर घालून पोटाशी कवटाळणारी! घर सुटलेलं, कुटुंब तुटलेलं, जवलग दुरावलेले, अशा शून्य अवस्थेत भिरभिरणारं ते एकुट पाखरूशिरलं मुंबईच्या कुशीत. - आणि बघता बघता सारं बदललं. ...
राजा शिवाजी हा निर्विवाद सिंहपुरुष होता. परंतु शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे पुरेपूर उमजलं आहे. एक दोनच नव्हे तर एकाचवेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेना-धुरंधर! मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला. जंजिरेकर सिद्धी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीस लाखांची फौज व चोदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य कारणासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच! विखारी विश्वास घातक्यांची! रणांगनाचा वाघ सतत नउ वर्षे पाठीशी घेत मुलुखभर दौडणारा हा ...
महापुराण-उपपुराण संच
श्री विष्णु पुराण
श्री मत्स्य पुराण
श्री वामन पुराण
श्री कुर्म पुराण
श्री ब्रम्हवैवर्त पुराण
श्री ब्रम्ह पुराण
श्री नारद पुराण
श्री गरुड पुराण
श्री वायु पुराण
श्री अग्नी पुराण
श्रीवराह पुराण
श्री पद्म पुराण
श्री विश्वकर्मा पुराण
श्री शिव पुराण
श्री लिंग पुराण
श्री भविष्य पुराण उपपुराण
श्री ब्रम्हांड पुराण
श्री गणेश पुराण
श्री नृसिंह पुराण
श्री मार्कण्डेय पुराण
"`नाटक’ हा मराठी माणसाचा मानबिंदू मराठी रंगभूमीला दीडशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेली आहे आणि भारतीय स्तरावर तिचे महत्त्व खूप मोठे आहे. या रंगभूमीने कालानुरूप, परिस्थितीनुरूप अनेक स्थित्यंतरे पाहिली, नवे प्रवाह स्वीकारले, त्यामुळेच आजही नाटक आणि मराठी रंगभूमी स्वत:चे अस्तित्व टिकवून आहे...वेळोवेळी झालेली राजकीय स्थित्यंतरे आणि सामाजिक सुधारणा यांपासून मराठी नाटक अलिप्त राहू शकले नाही. भोवतालच्या बदलत्या राजकीय सामाजिक परिस्थितीचे बरेवाईट परिणाम त्यावर होत होते. मकरंद साठे यांनी मराठी रंगभूमीच्या तीस रात्री या ग्रंथात मराठी रंगभूमीच्या गेल्या दीडशे वर्षांच्या इतिहासाचा लेखाजोगा घेतला आहे. बेंगळुरू ये...
हाल सातवाहनाची गाथा सप्तशती...महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास..समाजव्यवस्था..लोकरीती..ह्या बरोबरच दोन हजार वर्षापूर्वीचे अस्सल मराठमोळे नागरी..ग्रामीण व अन्य लोकजीवन ह्या गाथांत ललितमधूर सौंदर्याने नटलेले आहे..मानवी जीवनातील शाश्वत मूल्यांचा पुरस्कार करणारा मराठीतील श्रेष्ठ ग्रंथ..
"ब्रिटिश रियासती’च्या दोन खंडांमध्ये इ.स. १४९८ मध्ये पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को-द-गामाने भारताच्या पश्चिम किनार्याला आपले व्यापारी जहाज लावले तेव्हापासून १८५७ सालचा स्वातंत्र्यलढा मोडून काढत संपूर्ण भारतभर ब्रिटिश सत्तेचा विस्तार झपाट्याने झाला तोपर्यंतचा इतिहास आला आहे. ब्रिटिश कंपनीबरोबरच पोर्तुगीज, फ्रेंच, डच इत्यादी व्यापारी कपन्यांनीही आपले व्यवहार या देशाच्या किनार्यावर सुरू केले आणि त्या कंपन्यांचे व्यापार, त्यासाठी होणारी त्यांची स्पर्धा, त्यातून निर्माण झालेले संघर्ष यांचाही इतिहास या खंडांमध्ये येतो.
१८५७ नंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा येथील सत्ताधीशांशी वाढलेला संबंध आणि वाढल...
"मुसलमानी रियासतीच्या दोन खंडांतील इतिहासाचा कालखंड इ.स. १००० पासून इ.स. १७०७ पर्यंत सुमारे सातशे वर्षांचा आहे. महंमद गझनीच्या भारतावरील पहिल्या स्वारीने मुसलमानी इतिहासाचा आरंभ होतो आणि मोगल बादशहा औरंगजेबाच्या मृत्यूबरोबर या इतिहासाचा शेवट होतो. या इतिहासाबरोबरच इ.स. १००० पासून सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत गुजरातचा इतिहास, विजयनगरच्या साम्राज्याचा उदय, उत्कर्ष आणि अस्त, स्वतंत्र रजपूत राज्ये यांचा संक्षिप्त इतिहासही मुसलमानी रियासतीमध्ये वाचायला मिळतो. मुसलमान कोण होते? त्यांच्या पूर्वेतिहास कोणता? हे सांगत असतानाच रियासतकारांनी त्यांचा धर्म, संस्कृती, राजकीय धोरण, धर्मप्रसाराचे सूत्र, त्यांनी अरबस्ता...
12%
12%
15%
15%
5%
10%
10%
15%
10%
10%
15%
7%
11%
7%
10%
15%
11%
10%
8%
10%
10%
5%
10%
7%
10%
5%
8%
10%
10%
10%
10%
10%
10%
10%
15%
10%
10%
10%
10%
10%
10%
7%
10%
8%
10%
10%
10%
10%


